Govt. of Maharashtra
Accessibility controls ready
Secondary Training College logo
Satyamev Jayate emblem

उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन

सेकंडरी ट्रेनिंग कॉलेज, मुंबई

Secondary Training College, Mumbai

Dr. Homi Bhabha State University logo

Navigation

Cultural · 2025-26

सांस्कृतिक कार्यक्रम अहवाल २०२५-२६

Cultural Programme

6 February 2026

  • सांस्कृतिक कार्यक्रम अहवाल २०२५-२६

    2025-26 · 6 February 2026 · PDF

  • सांस्कृतिक कार्यक्रम अहवाल २०२५-२६

    2025-26 · 6 February 2026 · PDF (converted)

मूळ अहवाल

सांस्कृतिक कार्यक्रम अहवाल

शासकीय अध्यापक महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत उत्साहात व आनंददायी वातावरणात राबविण्यात आला या कार्यक्रमामध्ये प्रथम वर्ष छात्र अध्यापकांच्या विविध कलागुणांचे सादरीकरण करण्यात आले. छात्र अध्यापकांना या उपक्रमात कुलाप्रमाणे गटांमध्ये विभागण्यात आले होते. प्रत्येक कुलातील विद्यार्थ्यांना गटाने किंवा वैयक्तिकरित्या आपले कलागुण सादर करण्याची संधी देण्यात आली दिनांक ०६ फेब्रुवारी २०२६ रोजी ठीक ११.३० वा या सहशालेय उपक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम वर्ष छात्र अध्यापिका श्रीमती जया गिरी आणि अपर्णा शिंदे यांनी अत्यंत आत्मविश्वासपूर्ण व प्रभावी पद्धतीने केले

सहशालेय कार्यक्रमाची सुरुवात ही सरस्वती वंदनाने झाली सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार सहशालेय उपक्रमाच्या प्रमुख प्राध्यापिका डॉ सुनिता लोंढे प्रा. डॉ. सुविद्या सरवणकर डॉ सुनील सोनावणे आणि एम एड प्रशिक्षणार्थी यांनी केले त्यानंतर विविध कुलांच्या आकर्षक सादरीकरणांना ला सुरुवात झाली

सह्याद्री कुलाच्या ग्रुप प्रमुख सिमरण यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी प्रथम कोळीगीत सादर करून वातावरण प्रसन्न केले त्यानंतर विचारांची मशाल या नाटकाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचा संदेश देण्यात आला पुढे विद्यार्थ्यांनी सोलो डान्स सादर करून आपली नृत्यकला प्रकट केली तसेच अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर आधारित नाटकाद्वारे समाजातील अंधश्रद्धांविरुद्ध जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला सातपुडा कुलाच्या ग्रुप प्रमुख भाग्यश्री यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी शेतकरी गीत सादर करून शेतकऱ्यांच्या जीवनातील कष्ट आणि संघर्ष प्रभावीपणे मांडले वृद्धाश्रम एक आशा या नाटकाच्या माध्यमातून वृद्धांच्या समस्या व त्यांच्या भावना यांचे हृदयस्पर्शी चित्रण करण्यात आले पुढे सोलो सादरीकरण झाले आणि बेरोजगारी या गंभीर सामाजिक विषयावर विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून समाजजागृतीचा संदेश दिला यानंतर गिरनार कुलाच्या ग्रुप प्रमुख सागर यांच्या मार्गदर्शनाखाली विकट्री गीत सादर करण्यात आले. त्यानंतर महिला सक्षमीकरण या विषयावर आधारित नाटकाद्वारे स्त्रियांच्या सबलीकरणाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला शेवटी सोलो डान्स सादर करून विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्साह सहभाग आणि सर्जनशीलता स्पष्टपणे दिसून आली या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना वाव मिळाला तसेच सामाजिक जाणीव वाढीस लागण्यास मदत झाली

कार्यक्रमांच्या शेवटी डॉ सुनीता लोंढे प्रा. डॉ. सुविद्या सरवणकर डॉ. सुनील सोनावणे यांनी संपूर्ण कार्यक्रमावर भाष्य करून शेवटी प्रथम वर्ष छात्र अध्यापकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची संगता झाली.

Original college wording and files are preserved. Academic-year grouping follows the supplied collection; historical staff mentions are part of the report.

Back to Activity Reports