मूळ अहवाल
फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (FDP)
डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीच्या वतीने महाविद्यालयात दि. २० जानेवारी २०२६ ते २९ जानेवारी २०२६ या कालावधीत सहा दिवसीय Faculty Development Program (FDP) चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा मुख्य हेतू “Leadership Skills for Teachers: A Pathway to Students’ and Teachers’ Development” हा होता. शिक्षकांच्या नेतृत्वगुणांचा विकास, आधुनिक शैक्षणिक धोरणे, डिजिटल शिक्षण, भारतीय ज्ञानपरंपरा, मानसिक आरोग्य, संशोधन व जीवनकौशल्ये यांचा समन्वय साधणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमाचा सविस्तर आढावा :
या सहा दिवसीय कार्यक्रमाची सुरुवात २० जानेवारी २०२६ रोजी स्वागतगीत व दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय कुलगुरू प्रा राजनीश कामत व सन्माननीय कुलसचिव प्रा विलास पाध्ये, प्राचार्य डॉ. सुविद्या सरवणकर, डॉ सुनिल सोनवणे इ उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नेतृत्वगुण, शिक्षणातील बदल आणि प्रगतीचे महत्त्व अधोरेखित केले.
२० जानेवारी रोजी प्रा. अश्विन हाबळे करवंद यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) मधील डिजिटल शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले तसेच मेंटोरिंग संदर्भातील विविध मॉडेल्सची माहिती दिली. संजय शेडमाके यांनी डिजिटल साधनांचा वापर आणि Canva सारख्या प्लॅटफॉर्मद्वारे शैक्षणिक साहित्य तयार करण्याचे मार्गदर्शन केले. संजय निंबाळकर यांनी भारतीय ज्ञानपरंपरेचा गौरव सांगत प्राचीन विज्ञान व आयुर्वेदाचे महत्त्व पटवून दिले.
२१ जानेवारी रोजी व्यक्तिमत्त्व विकास, संशोधन व मानसिक आरोग्य या विषयांवर भर देण्यात आला. डॉ. उमाकांत देशमुख यांनी RAHAT मॉडेल आणि व्यक्तिमत्त्व प्रकार समजावून सांगितले. डॉ. प्रज्ञा वाकपंजण यांनी Action Research ची संकल्पना स्पष्ट करत शिक्षकाने नेहमी खुले मन ठेवावे असे सांगितले. डॉ. पूजा सोनी यांनी तणाव व्यवस्थापन व सकारात्मक विचारसरणीचे महत्त्व पटवून दिले. डॉ. गौरी हार्डीकर यांनी जीवनकौशल्ये, स्व-जाणीव आणि आत्मविश्वास वाढवण्याच्या पद्धती शिकवल्या.
२२ जानेवारी रोजी भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम पाहायला मिळाला. डॉ. सुरेंद्र हरक यांनी प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीचे महत्त्व आणि तिचा जागतिक प्रभाव स्पष्ट केला. डॉ. वैभव जाधव यांनी Artificial Intelligence (AI) चा शिक्षणातील उपयोग दाखवून दिला तसेच ज्ञानमीमांसा (Epistemology) या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. डॉ. प्रतिभा उर्सल यांनी Formative Assessment आणि आधुनिक मूल्यमापन पद्धतीचे महत्त्व स्पष्ट करत विविध कृतींच्या माध्यमातून शिकवले.
२७ जानेवारी रोजी मानसिक आरोग्य, आनंद आणि स्व-जाणीव यावर विशेष भर देण्यात आला. डॉ. चंद्रशेखर चक्रदेव यांनी Psychology of Happiness समजावून सांगत आनंदाचे विविध स्तर स्पष्ट केले. त्यांनी मानसिक आरोग्य, तणाव व्यवस्थापन आणि Johari Window या संकल्पनांवर मार्गदर्शन केले. विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळाली.
२८ जानेवारी रोजी सॉफ्ट स्किल्स आणि करिअर मार्गदर्शनावर भर देण्यात आला. डॉ. प्रशांत काळे यांनी Soft Skills व Cycle of Anger स्पष्ट केले. डॉ. सुरेश इसावे यांनी MOOC, SWAYAM, NPTEL, DIKSHA यांसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मची माहिती दिली. TET/CTET परीक्षेची तयारी, वेळेचे नियोजन आणि शिक्षक भरती प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. प्रा. अलका गायकवाड यांनी पवित्र पोर्टल व भरती प्रक्रियेचे सविस्तर मार्गदर्शन केले.
२९ जानेवारी रोजी आणि अंतिम दिवशी कुमारवयीन मुलांचे मानसशास्त्र, मानसिक आरोग्य आणि AI आधारित अध्यापन यावर मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. रेनी फ्रान्सिस यांनी किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या वर्तनातील बदल, एकाग्रता आणि मानसिक स्थिती स्पष्ट केली. त्यांनी Work-Life Balance आणि तणाव व्यवस्थापनाचे महत्त्व सांगितले. डॉ. अमोल उबाळे यांनी AI Tools, VR आणि आधुनिक प्रेझेंटेशन साधनांचे प्रात्यक्षिक दाखवले. ChatGPT आणि Gemini यांसारख्या साधनांचा वापर करून अध्यापन अधिक प्रभावी कसे करावे, हे त्यांनी शिकवले.
२० जानेवारी २०२६ ते २९ जानेवारी २०२६ या काळवधीतमध्ये झालेल्या या Faculty Development Program (FDP) मुळे शिक्षकांच्या ज्ञानात, कौशल्यात आणि आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाली. या कार्यक्रमातून आधुनिक तंत्रज्ञान, मानसिक आरोग्य, भारतीय ज्ञानपरंपरा आणि नेतृत्व कौशल्ये यांचा समन्वय साधला गेला.
या उपक्रमाचा शिक्षकांच्या अध्यापन पद्धतीवर तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवर, मार्गदर्शक, आयोजक आणि सहभागी प्रशिक्षणार्थींचे मनःपूर्वक आभार मानून कार्यक्रमाची यशस्वी सांगता करण्यात आली. या Faculty Development Program (FDP) साठी समन्वयक म्हणून प्राचार्य डॉ. सुविद्या सरवणकर व डॉ सुनिल सोनवणे यांनी कार्य केले.


