Govt. of Maharashtra
Accessibility controls ready
Secondary Training College logo
Satyamev Jayate emblem

उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन

सेकंडरी ट्रेनिंग कॉलेज, मुंबई

Secondary Training College, Mumbai

Dr. Homi Bhabha State University logo

Navigation

Field Visit · 2025-26

क्षेत्रभेट अहवाल २०२५-२६

Field Visits

  • क्षेत्रभेट अहवाल २०२५-२६

    2025-26 · PDF (converted)

  • क्षेत्रभेट अहवाल २०२५-२६

    2025-26 · PDF

मूळ अहवाल

क्षेत्रभेट

नेहरू सायन्स सेंटर क्षेत्रभेट

दिनांक ४ जुलै२०२५ रोजी महाविद्यालयातर्फे शैक्षणिक क्षेत्रभेटी अंतर्गत नेहरू सायन्स सेंटरला भेट देण्यात आली. या क्षेत्रभेटीमध्ये प्रथमवर्ष छात्रअध्यापक व प्राध्यापक यांचा समावेश होता. ३२ विद्यार्थी आणि 2 प्राध्यापक अशा एकूण ३४ जणांचा या क्षेत्रभेटी मध्ये सहभाग होता. सर्वप्रथम नेहरू सायन्स सेंटरची थोडक्यात माहिती देण्यात आली. त्यानंतर छात्रअध्यापकांना थ्रीडीशो दाखवण्यात आला. त्यामध्ये विविधप्राणी, पक्षी, यांचे जीवनकसे असते. पर्यावरणाचा ऱ्हास कसा होतो , जंगलामध्ये आग कशी लागते, हे सर्व दाखवण्यात आले. तसेच पृथ्वीवरील जीवांची सुंदरअशी माहिती देण्यात आली .हे सराव झाल्या वरती नंतर SOS शो दाखवण्यातआला. त्यामध्ये बुध, गुरु, शुक्र, शनीअश्या विविध ग्रहांची माहिती देण्यात आली त्यानंतर सर्व छात्रअध्यापकांना सायन्स एक्सपिरिमेंट आणि हायहोल्टेज हे शो दाखवण्यात आले, त्यामध्ये प्रत्यक्ष प्रयोग करून दाखवले गेले. त्यानंतर नेहरू सायन्स सेंटरमधील विविध गॅलरीना भेट देण्यात आली. त्यामधील प्रमुख गॅलरीज – सायन्स फॉरचिल्ड्रन गॅलरी, साउंड अँड हेरिंग गॅलरी, लाईट अँड स्लाईड गॅलरी, वुमन अँडमशीन मिरर द रिफ्लेक्टिंग सरफेस गॅलरी, यामधून सर्व अध्यापकांना खूप काही शिकायला आणि अनुभवायला मिळाले. गॅलरी विजिट झाल्यावरती छात्रअध्यापकांनी सायन्सगार्डनला भेट दिली या गार्डनमध्ये लहानमुलांसाठी विविध प्रयोग दाखवलेले आहेत तसेच या गार्डन मध्ये लहान मुलांसाठी खूप सार्‍या खेळण्याच्या गोष्टी बघायला मिळाल्या आणि त्या गोष्टीचा विद्यार्थ्यांनीसुद्धा आनंद घेतला. नेहरू सायन्स सेंटर मध्ये खूप सार्‍या गोष्टी छात्रअध्यापकांना शिकायला मिळाल्या ही क्षेत्रभेट विज्ञान विभाग प्रमुख डॉ. सुविद्या सरवणकर यांनी आयोजित केली.

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयास क्षेत्रभेट

दिनांक 27 जून 2025 रोजी महाविद्यालयातर्फे शैक्षणिक क्षेत्रभेटी अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयास भेट देण्यात आली. छात्र अध्यापक प्राध्यापक वर्ग यांच्या समवेत प्रवेश केल्यानंतर वस्तू संग्रहालयामध्ये माहिती देण्यासाठी योग्य त्या मार्गदर्शकांची देखील सोय होती. त्यानंतर गाईड श्री. तुषार कदम यांनी वास्तू संग्रहालयाचा इतिहास थोडक्यात सर्व छात्र अध्यापकांना सांगितला. इतिहास हा विषय विद्यार्थ्यांना शिकवताना खेळीमेळीने व वेगवेगळ्या वस्तूंनी कशाप्रकारे शिकवू शकतो त्याची योग्य ती माहिती विद्यार्थ्यांपर्यंत कशी पोहोचवता येईल याची सुंदर रित्या माहिती देण्यात आली.

वस्तूसंग्रहालयात पारंपारिक दागिने, शिल्पकला दालन , इजिप्तशियन मम्मी, नाणी, मूर्तीं, चित्रे, पारंपारिक वस्त्रे, चिनी मातीची भांडी, या सर्वांची सखोल माहिती देण्यात आली. वस्तू संग्रहालयात अनेक परंपरा व ऐतिहासिक माहितीने परिपूर्ण अशी दालने होती. ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय भेट हा सर्व छात्राध्यापकांसाठी अविस्मरणीय अनुभव होता. ही क्षेत्रभेट इतिहास विभाग प्रमुख डॉ. सुनीता लोंढे यांनी आयोजित केली.

नेहरू तारांगण क्षेत्रभेट

दिनांक ११ जुलै २०२५ रोजी महाविद्यालयातर्फे शैक्षणिक क्षेत्रभेटी अंतर्गत नेहरू सायन्ससेंटरला आणि नेहरू प्लॅनेटोरियम (वर्ली, मुंबई) येथे शैक्षणिक क्षेत्रभेट देण्यात आली. या क्षेत्रभेटीमध्ये प्रथमवर्ष छात्रअध्यापक व प्राध्यापक यांचा समावेश होता. ३२ विद्यार्थी आणि ३ प्राध्यापक वृंद अशा एकूण ३२ जणांचा या क्षेत्रभेटीमध्ये सहभाग होता. ही क्षेत्रभेट अत्यंत माहितीपूर्ण, अनुभव संपन्न आणि विज्ञान व खगोलशास्त्रा संदर्भात कुतूहल निर्माण करणारी ठरली. सर्वप्रथम आम्ही नेहरू सायन्स सेंटर मध्ये विविध विज्ञान गॅलऱ्या पाहिल्या जसे की ऊर्जा, यांत्रिकी, प्रकाश, ध्वनी, मानवशरीर, संप्रेषण आणि पर्यावरण. प्रत्येक गॅलरीमध्ये थेट हाताळण्याजोगी (interactive) उपकरणे, 3Dमॉडेल्स, तसेच व्हिज्युअल डिस्प्लेमुळे संकल्पना समजायला खूप सोप्या आणि रंजक वाटल्या. सायन्स पार्कमध्ये सनडायल, पेंडुलम, ध्वनीनलिका आणि बल-गतीयांसारखी उपकरणे पाहता आली. विशेषतः ‘Discovery of India’ गॅलरीने आमच्या मनावर गारुड केले. ज्यामध्ये सिंधू-सरस्वती संस्कृती, वैदिकआणि बौद्धतत्त्वज्ञान, भारताचा सामाजिक व तांत्रिक विकास, आणि भारतीय शास्त्रज्ञांची ऐतिहासिक कामगिरी सुंदर सादरीकरणाच्या माध्यमातून उलगडली गेली. त्यानंतर आम्ही नेहरू प्लॅनेटोरियम मध्ये गोलाकार डोमच्या प्रेक्षागृहात 'थ्रीडीडोमशो' पाहिला, ज्यात सुरुवातीला ऑस्ट्रेलियाच्या जंगलातील वेगवेगळ्या बेडकांवरील संशोधन, त्यांचे जीवनचक्र आणि पर्यावरणातील त्यांचे स्थान समजावण्यात आले. त्यानंतर सूर्यमाला, आठहीग्रह, त्यांचे उपग्रह, सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती, चंद्रा चे परिभ्रमण, विविध राशी, ताऱ्यांचे गट आणि आकाशगंगा याविषयांवरील सजीवदृश्येअत्यंत थक्क करणाऱ्या दृकश्राव्य तंत्रज्ञानाद्वारे सादरकरण्यात आली. हा शो इतका प्रभावी होता की क्षणभर आम्हाला प्रत्यक्ष अंतराळात असल्याचा भास झाला. ही क्षेत्रभेट केवळ अभ्यासापुरती मर्यादित राहिली नाही, तर विज्ञान, तंत्रज्ञान आणि खगोलशास्त्र याविषयांमध्ये नव्यानेगोडी निर्माण करणारी, समृद्ध करणारी आणि मनात कायमची घर करणारी ठरली. ही क्षेत्रभेट विज्ञान विभाग प्रमुख डॉ. सुविद्या सरवणकर यांनी आयोजित केली.

समावेशक शाळा भेट अहवाल

बी.एड. अभ्यासक्रमाचा समावेशक अध्ययन (IC4) भाग म्हणून, सांताक्रूझ पूर्व येथील घरकुल शाळेला ४ फेब्रुवारी २०२६ रोजी भेट देण्यात आली. ही शाळा ऑटिझम, अतिसक्रियता, कमी बुद्धिमत्ता (IQ) आणि शिकण्याच्या अडचणी असलेल्या विशेष बालकांसाठी मोफत शिक्षण, थेरपी आणि कौशल्य विकास प्रदान करते.

ही शाळा सुनील सर आणि विनोद सर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच मुख्याध्यापिका सुकेशिनी मॅडम यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. शाळा प्रत्येक मुलाच्या गरजेनुसार तयार केलेल्या बालक केंद्रित अभ्यासक्रमावर आधारित आहे. मुलांच्या बुद्ध्यांकानुसार वर्ग वाटप केले जाते आणि नियमित मूल्यमापनानंतर वर्गांतर्गत बढती दिली जाते. शाळेत माती कला, एकाग्रतेसाठी संगीत थेरपी, आणि मोठ्या मुलांसाठी रोजगारक्षम प्रशिक्षण यांसारख्या क्रियाकलापांद्वारे सर्वांगीण विकासावर भर दिला जातो, ज्यामुळे ते आर्थिक उत्पन्न मिळवू शकतात. टेबल मॅनर्स, स्वच्छतेचे प्रशिक्षण आणि स्वावलंबन वाढवण्यासाठी दैनंदिन कौशल्ये शिकवली जातात. मांडगीनी शेजावाळ यांसारख्या स्वयंसेवकांसोबतच शिक्षक, थेरपिस्ट आणि कर्मचारी यांच्या समर्पणाने प्रत्येक मुलाची काळजी घेण्यासाठी राबवलेल्या वैयक्तिक दृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित झाले. या भेटीद्वारे समावेशक शिक्षणाच्या परिवर्तनशील प्रभावाची जाणीव झाली आणि प्रत्येक मुलाला प्रोत्साहन देणारे, सहकार्याने समृद्ध वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी सहानुभूती, संयम आणि नावीन्यपूर्ण दृष्टिकोन स्वीकारण्याचे महत्त्व अधोरेखित झाले. ही क्षेत्रभेट विषय विभाग प्रमुख डॉ. सुविद्या सरवणकर यांनी आयोजित केली.

Original college wording and files are preserved. Academic-year grouping follows the supplied collection; historical staff mentions are part of the report.

Back to Activity Reports