मूळ अहवाल
गुरुपौर्णिमा:
१० जुलै २०२५ रोजी महाविदयालयात गुरुपौर्णिमा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना शिक्षक, गुरु, आपले आई-वडील यांप्रती आदरभाव व्यक्त करणे हा होता. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ. सुविदया सरवणकर आणि प्रा. डॉ. सुनिता लोंढे यांनी सरस्वती मातेच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून केली .सर्वप्रथम कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुविद्या सरवणकर यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर डॉ. सुनिता लोंढे, डॉ. प्रा . अपर्णा उबाळे, प्रा. निलम फोंडके , प्रा. मंगेश पाटील यांचे स्वागत करण्यात आले. स्वागतानंतर विद्यार्थ्यांनी गुरुप्रती असलेला आदर व्यक्त केला. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुविद्या सरवणकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.
बिरसा मुंडा जयंती
दिनांक ९ ऑगस्ट रोजी आमच्या महाविद्यालयात/शाळेत आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय डॉ. सुविद्या सरवणकर यांनी भूषविले.
कार्यक्रमाची सुरुवात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर भाषणे सादर केली. त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, आदिवासी समाजासाठी केलेले कार्य याबद्दल विद्यार्थ्यांनी माहितीपूर्ण मांडणी केली. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य, नाटिका व समूहगायन सादर केले. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, सामाजिक जाणीव आणि आदिवासी संस्कृतीबद्दल आदर निर्माण झाला. नाटिकेमधून बिरसा मुंडा यांच्या संघर्षमय जीवनाचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. अध्यक्ष डॉ. सुविदया सरवणकर यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना बिरसा मुंडा यांच्या विचारांचे अनुसरण करण्याचे आवाहन केले. डॉ. सुनिता लोंढे यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करून अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास चालना मिळते, असे सांगितले.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. अशा प्रकारे बिरसा मुंडा जयंती निमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला.
वाचन प्रेरणा दिन अहवाल
15 ऑक्टोंबर २०२५ रोजी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना वाचण्याची प्रेरणा देणे, वाचण्याची सवय निर्माण करणे व आवड निर्माण करणे हा होता. प्राचार्य डॉ सुविदया सरवणकर आणि प्रा डॉ सुनिता लोंढे यांनी सरस्वती मातेच्या प्रतिमेसमोर दिवा लावून दीपप्रज्मन केले त्यानंतर शिक्षकवर्ग आणि मराठी वाङमय मंडळातील विद्यार्थ्यानी सरस्वती मातेला फुले अर्पण केली. पुस्तक प्रदर्शनादरम्मान दिंडी काढण्यात येवून पुस्तक प्रदर्शन मांडण्यात आले.
सर्वप्रथम कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्य डॉ सुविद्या सरवणकर यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर मराठी वाङमय मंडळाचे मार्गदर्शिक डॉ. सुनिता लोंढे , डॉ. प्रा. अपर्णा उबाळे, प्रा निलम फोंडके ,प्रा. मंगेश पाटील यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले शेवटी कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. सुविद्या सरवणकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली. अशाप्रकारे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.
शिक्षक दिन:
दिनांक ५ सप्टेंबर २०२५ रोजी महाविद्यालयात ‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना गीताने झाली. त्यानंतर प्राचार्य डॉ. सुविद्या सरवणकर यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी गाणी, कविता, नाटिका व भाषणे सादर केली. काही विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या शिक्षकांचे अनुकरण करून वर्ग घेतले आणि तो अनुभव अतिशय प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी प्राध्यापक, शिक्षकांचे योगदान व विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यातील त्यांची भूमिका यावर सुंदर भाषण केले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना फुलांचा गुच्छ व शुभेच्छा पत्र देऊन आपले प्रेम व्यक्त केले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती:
३ जानेवारी २०२६ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. सुविद्या सरवणकर, प्राध्यापक सुनिल सोनवणे तसेच प्रथम व द्वितीय वर्षांचे विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांचे कार्य आणि योगदान यावर भाषण आणि सादरीकरण केले. भाग्यश्री बुंदे यांनी सूत्रसंचालन केले आणि शेवटी मान्यवरांचे आभार मानण्यात आले.
राजमाता जिजाऊ जयंती,स्वामी विवेकानंद जयंती
१२ जानेवारी रोजी, राजमाता जिजाऊ जयंती,स्वामी विवेकानंद जयंती तसेच राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विचारवंतांचे विचार युवा पिढी पर्यंत पोहचवणे तसेच त्यांना पुढील वाटचालीस प्रोत्साहन देणे. त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घेणे हा होता. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून झाली. प्रास्ताविकातून महान व्यक्तींच्या विचारांचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. प्रमुख पाहुणे डॉ. सुनीता लोंढे व युवा प्रतिनिधी अध्यक्ष साक्षी म्हसे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी युवकांनी आत्मविश्वास, परिश्रम व देशभक्ती या गुणांचा स्वीकार करून उज्ज्वल भविष्य घडवावे, असे सांगितले. कार्यक्रम शेवटी आभार प्रदर्शनाने संपन्न झाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती:
१४ एप्रिल २०२६ रोजी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्याची ओळख करून देणे व त्यांच्या विचारांद्वारे सामाजिक समानतेचा संदेश पोहोचवणे हा होता. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रार्थनेने करण्यात आली. प्राचार्या डॉ. सुविदया सरवणकर, प्रा.निलम फोंडके यांच्या उपस्थितीत डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली गेली. विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित भाषण व भिमवंदना सादर करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्या डॉ. सुविदया सरवणकर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना डॉ. आंबेडकर यांच्या विचारांवर चालण्याचे आणि समाजात समानतेचा प्रसार करण्याचे आवाहन केले.


