Govt. of Maharashtra
Accessibility controls ready
Secondary Training College logo
Satyamev Jayate emblem

उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन

सेकंडरी ट्रेनिंग कॉलेज, मुंबई

Secondary Training College, Mumbai

Dr. Homi Bhabha State University logo

Navigation

Cultural · 2025-26

मराठी भाषा गौरव दिन अहवाल

Marathi Bhasha Gaurav Din

  • मराठी भाषा गौरव दिन अहवाल

    2025-26 · PDF (converted)

  • मराठी भाषा गौरव दिन अहवाल

    2025-26 · PDF

मूळ अहवाल

मराठी भाषा गौरव दिन अहवाल

मराठी राजभाषा दिन अहवालमहाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे सुप्रसिद्ध साहित्यिक विष्णु वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त ‘२७ फेब्रुवारी’ हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मातृभाषेचा गौरव जपण्याच्या आणि कुसुमाग्रजांच्या स्मृतीला अभिवादन करण्याच्या उद्देशाने यंदाही महाविद्यालयात मराठी गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन गटप्रमुख निलाक्षी दही (FY) व चैतन्य जाधव (SY) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात प्रेरणा व महादेवी यांनी प्रभावी प्रस्तावनेद्वारे केली. त्यांच्या मनोगतातून मराठी भाषेचे महत्त्व आणि तिच्या जतनाची गरज स्पष्टपणे अधोरेखित झाली. यानंतर कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. पारंपरिक पद्धतीने पालखी काढण्यात आली, ज्यामुळे वातावरणात सांस्कृतिक उत्साहाची उधळण झाली. विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालावर वर्गात प्रवेश करून कार्यक्रमाला जोशपूर्ण रंगत दिली. मराठी साहित्याचा गौरव करण्यासाठी विविध साहित्यिक वस्तू, पारंपरिक पदार्थ आणि पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या माध्यमातून विद्यार्थ्यांना मराठी संस्कृती आणि साहित्यसंपदेची समृद्ध ओळख झाली. कार्यक्रमात “मराठी गौरव दिन” निमित्त कविता सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले. जयेश जबर आणि रोहिणी पोतदार यांनी सादर केलेल्या प्रभावी कवितांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

या प्रसंगी महाविद्यालयातील शिक्षकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. डॉ. सोनवणे तसेच M.Ed. विभागातील छात्राध्यापक यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. सुनीता लोंढे यांनी भूषविले.

कार्यक्रमाच्या समारोपावेळी रोहित चिपट यांनी आभार प्रदर्शन करून सर्व मान्यवर, शिक्षक व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. अशा प्रकारे मराठी भाषा आणि संस्कृतीचा गौरव करणारा “मराठी राजभाषा दिन” कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला. हा कार्यक्रम डॉ सुनिता लोंढे यांनी आयोजित केला.

Original college wording and files are preserved. Academic-year grouping follows the supplied collection; historical staff mentions are part of the report.

Back to Activity Reports