मूळ अहवाल
राष्ट्रीय गणित दिन अहवाल
महाविद्यालयात 22 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रीय गणित दिनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक आणि प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष छात्र-अध्यापक उपस्थित होते. प्राध्यापकांच्या उपस्थितीत डॉ. सुविद्या सरवणकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या विज्ञान मंडळांने प्राध्यापक डॉ. सुविद्या सरवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष व प्राध्यापकांच्या शुभहस्ते, दीपप्रज्वलन करून भारतीय शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रमन ह्यांच्या स्मृतीला पुष्प अर्पण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. विज्ञान गटातील सर्व विद्यार्थ्यांनी या महत्त्वपूर्ण दिवसाचे महत्त्व अधोरेखित करून कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी स्वीकारली.
सर्वप्रथम श्रीनिवास रामानुजन यांच्या विषयी माहिती देण्यात आले. त्यामध्ये त्यांचा इतिहास त्यांनी गणितामध्ये लावलेला शोध, त्यांना मिळालेले पुरस्कार या विषयावर प्रथम वर्ष छात्र अध्यापकांनी भाषणे केली. तसेच छात्रअध्यापकांसाठी प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचा मोलाचा सहभाग होता आणि गणितीय खेळ राबविण्यात आले होते. सर्व विद्यार्थी आनंदाने सहभागी झाले होते.
डॉ. सुविद्या सरवणकर यांनी गणित जागतिक स्थितीचा आढावा घेत गणित दिनाचे महत्व अधोरेखित केले व या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी केलेल्या अप्रतिम सादरीकरणाबाबत त्यांचे कौतुक केलेत्यांनतर प्रथम वर्ष छात्र-अध्यापिकेने आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.या कार्याकरता विज्ञान मंडल प्रमुख डॉ. सुविद्या सरवणकर यांचे मार्गदर्शन लाभले.


