Govt. of Maharashtra
Accessibility controls ready
Secondary Training College logo
Satyamev Jayate emblem

उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन

सेकंडरी ट्रेनिंग कॉलेज, मुंबई

Secondary Training College, Mumbai

Dr. Homi Bhabha State University logo

Navigation

Academic · 2025-26

राष्ट्रीय विज्ञान दिन अहवाल

National Science Day

  • राष्ट्रीय विज्ञान दिन अहवाल

    2025-26 · PDF (converted)

  • राष्ट्रीय विज्ञान दिन अहवाल

    2025-26 · PDF

मूळ अहवाल

राष्ट्रीय विज्ञान दिन अहवाल

२८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि ज्ञानवर्धक वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 12 वाजता झाली. कार्यक्रमाची सुरुवात लेझीम खेळून पालखी काढण्यात आली, ज्यामुळे वातावरणात उत्साह निर्माण झाला.या कार्यक्रमाला उपस्थित प्राचार्य डॉ. सुविद्या सरवणकर तसेच सर्व प्राध्यापकांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर महान शास्त्रज्ञ C. V. Raman यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर विज्ञान व गणित पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी व ऐश्वर्या यांनी आत्मविश्वासपूर्ण आणि प्रभावी पद्धतीने केले. त्या नंतर विज्ञान दिवस या वर माहिती सांगितली. नंतर C V Raman यांच्या विषयी माहिती सांगण्यात आली .

कार्यक्रमादरम्यान सोनाली निकुंभ यांनी "बुवा बाजी" या अंधश्रद्धेशी संबंधित प्रयोगांचे व्हिडिओ दाखवून त्याचे शास्त्रीय स्पष्टीकरण केले. तसेच श्वेता यांनी "Myth and Facts" या विषयावर PPT सादरीकरण करून अंधश्रद्धा व विज्ञान यामधील फरक स्पष्ट केला. त्या नंतर M.ed च्या छात्र अध्यापकांनी Quiz compitition हे Khoot app च्या माध्यमातून घेतले. तसेच विद्यार्थ्यांनी Raman Effect या विषयावर माहिती सादर केली, ज्यामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानातील महत्त्वपूर्ण संकल्पना समजल्या. त्या नंतर विज्ञान दिवस निमित्ताने शप्पत घेण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष भाषण झाले

संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरून त्यांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा व संशोधनाची आवड निर्माण करणारा ठरला. हा कार्यक्रम प्राचार्य डॉ. सुविद्या सरवणकर यांनी आयोजित केला.

Original college wording and files are preserved. Academic-year grouping follows the supplied collection; historical staff mentions are part of the report.

Back to Activity Reports