Govt. of Maharashtra
Accessibility controls ready
Secondary Training College logo
Satyamev Jayate emblem

उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन

सेकंडरी ट्रेनिंग कॉलेज, मुंबई

Secondary Training College, Mumbai

Dr. Homi Bhabha State University logo

Navigation

Cultural · 2025-26

सह्याद्री कुल अहवाल २०२५-२६

Sahyadri House

  • सह्याद्री कुल अहवाल २०२५-२६

    2025-26 · PDF (converted)

  • सह्याद्री कुल अहवाल २०२५-२६

    2025-26 · PDF

मूळ अहवाल

आंतरराष्ट्रीय योग दिन

दिनांक २१ जुन २०२५ रोजी ऑनलाइन योगा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. सह्याद्री कुलांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षा प्रा. डॉ. सुविद्या सरवणकर होत्या . त्यानिमित्ताने योग शिक्षक म्हणून श्री आचार्य प्रियतोषानंद गुरुजी यांनी भूमिका बजावली व सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी योग या विषयाबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली व त्यांना विविध प्रात्यक्षिके करून दाखवली तसेच सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे बघून योग करण्याचा प्रयत्न केला . सर्वांचे शरीर हे लवचिक व मजबूत व्हावे हेच या मागचा हेतू होता व सर्व छात्र अध्यापकांना योगाचे महत्त्व समजावून त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यात त्याचा वापर करण्यास प्रवृत्त करणे हा ह्या मागचा हेतू साध्य करण्यात यश आले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. आचार्य प्रियतोषानंद यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले व प्रा. डॉ. सुविद्या सरवणकर यांनी अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाचा समारोप केला .

"संविधान दिन"

शासकीय अध्यापक महाविद्यालय, मुंबई–०१ येथे दि. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. हा दिवस भारताने आपले संविधान स्वीकारल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. यामुळे घटनात्मक मूल्यांबद्दल जागरूकता निर्माण होते तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाला आदरांजली वाहिली जाते. दि. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाचे संविधान स्वीकारण्यात आले, तर ते दि. २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले आणि भारत प्रजासत्ताक बनला. म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुविद्या सरवणकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संविधानाचे वाचन केले तसेच संविधानावर आधारित भाषणे सादर केली. याशिवाय विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर कविता सादर केल्या.

कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. संविधान दिनाच्या या कार्यक्रमामुळे उपस्थित सर्वांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता निर्माण झाली आणि राष्ट्रीय मूल्यांविषयी आदर वाढला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

(IBM) SkillsBuild Digital Awareness Workshop विषयक मार्गदर्शन कार्यक्रम

दिनांक : २७/११/२०२५

मार्गदर्शक : श्री. प्रकाश लोखंडे

दि. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी महाविद्यालयात IBM SkillsBuild Digital Awareness Workshop या विषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये श्री. प्रकाश लोखंडे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात परिचयाने झाली. त्यानंतर त्यांनी AI म्हणजे काय, AI कसे कार्य करते आणि आजच्या जीवनात AI चा वापर कसा केला जातो हे अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले. मोबाईल, संगणक, इंटरनेट, चॅटबोट आणि स्मार्ट तंत्रज्ञानामध्ये AI चा कसा उपयोग होतो याची उदाहरणे त्यांनी दिली. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. प्रकाश लोखंडे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) या विषयाची सविस्तर माहिती दिली. AI म्हणजे काय, त्याचा आजच्या काळातील वापर, शिक्षण, उद्योग, आरोग्य आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्व तसेच भविष्यातील संधी याबाबत त्यांनी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी एआय विषयाबाबत उत्सुकतेने प्रश्न विचारले आणि श्री. लोखंडे यांनी सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये एआय विषयी जागरूकता निर्माण झाली आणि नव्या तंत्रज्ञानाबद्दलची आवड वाढली. तसेच विद्यार्थ्यांनी IBM SkillsBuild चा ऑनलाईन कोर्स जॉईन केला व तो पूर्ण केला. या कोर्समुळे विद्यार्थ्यांना डिजिटल कौशल्ये, एआय, तंत्रज्ञान आणि करिअरविषयक महत्त्वाची माहिती मिळाली. कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याना IBM कडून प्रमाणपत्र देण्यात आले. हा कार्यक्रम आणि कोर्स विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त ठरला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढले तसेच भविष्यासाठी नवी दिशा मिळाली.

महात्मा ज्योतिराव फुले पुण्यतिथी

दिनांक २८ नोव्हेंबेर २०२५ रोजी महाविद्यालयात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम श्रद्धापूर्वक साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रार्थनेने झाली. विद्यार्थिनी एकता मोहिते हिने महात्मा फुले यांच्या जीवनप्रवासाबद्दल माहिती दिली, तर साक्षी म्हसे हिने त्यांच्या समाजकार्य आणि शैक्षणिक योगदानाविषयी प्रभावी भाषण केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य डॉ. सुविदया सरवणकर यांनी विद्यार्थ्यांना फुले यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास डॉ. सुनिता लोंढे आणि डॉ. सुनिल सोनवणे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी आणि यशस्वी ठरला.

महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी महाविद्यालयात एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचा उद्देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याची ओळख करून देणे व त्यांच्या विचारांचा विद्यार्थ्यांमध्ये प्रसार करणे हा होता. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी दोन मिनिटांचे मौन पाळून त्यांना आदरांजली वाहिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. सुनीता लोंढे होत्या. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. सुनील सोनवणे उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक व संविधानिक योगदानावर सविस्तर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांना समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या मूल्यांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट करून सांगितले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाषणे, कविता व विचारमांडणी करून बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन केले. काही विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी अनुभव, कथन व गायन सादर केले. त्यामुळे संपूर्ण वातावरण गंभीर व प्रेरणादायी झाले होते. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची व विचारांची सखोल माहिती मिळाली आणि समाजातील समानतेसाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळाली.

कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. सुनीता लोंढे यांची परवानगी घेऊन कार्यक्रम समाप्त झाल्याचे जाहीर करण्यात आले. अशा प्रकारे महाविद्यालयात आयोजित केलेला महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला.

Original college wording and files are preserved. Academic-year grouping follows the supplied collection; historical staff mentions are part of the report.

Back to Activity Reports