मूळ अहवाल
राखी बनवणे
३१ जुलै रोजी, राखी बनवण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. प्राचार्य डॉ. सुविद्या सरवणकर यांनी राखी बनवण्याचे प्रात्यक्षिक केले प्रत्येक विद्यार्थ्याने वेगवेगळ्या डिझाइन्सच्या सुंदर राख्या स्वतः बनवल्या. राख्या बनवण्यासाठी रंगीत कागद, रेशमी धागे, मणी, सजावटीचे साहित्य इत्यादींचा वापर करण्यात आला. सर्व बी.एड. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्साहाने भाग घेतला. सर्व तयार राख्या एकत्र केल्या गेल्या आणि देशाच्या सीमेवर सेवा देणाऱ्या सैनिकांना पाठवल्या गेल्या. "सीमेवरील सैनिकही आपला भाऊ आहे" ही भावना या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आली
आर्थिक गुंतवणूक साक्षरता अभियान:
महाविद्यालयात दिनांक ११ ऑक्टोंबर २०२५ रोजी आर्थिक गुंतवणूक साक्षरता अभियान राबवण्यात आला. या साक्षरता अभियानाचे आयोजन सातपुडा कुलाने केले. कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. ओमकार परब(अर्थतज्ञ) उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना गुंतवणुकीचे महत्त्व, शेअर बाजार, जोखीम व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
शिवजयंती उत्सव
१९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी सुंदर पद्धतीने पालखी सजवून आणली होती, ज्यामुळे कार्यक्रमाचे आकर्षण अधिक वाढले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय व अपर्णा यांनी आत्मविश्वासपूर्ण आणि प्रभावी पद्धतीने केले. भाग्यश्री यांनी सादर केलेली जोशपूर्ण शिवगर्जना सर्वांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणारी ठरली.यानंतर अपर्णा व भाग्यश्री यांनी UNESCO यांनी गड-किल्ल्यांना प्रदान केलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाबाबत PPT सादरीकरण केले. या सादरीकरणातून विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वारशाचे महत्त्व समजले. श्वेता यांनी अष्टप्रधान मंडळ याबद्दल सुस्पष्ट व माहितीपूर्ण विवेचन केले, ज्यातून शिवाजी महाराजांच्या प्रशासन व्यवस्थेची ओळख झाली. या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. सुविद्या सरवणकर तसेच डॉ. सुनीता लोंढे व डॉ. सुनील सोनावणे यांची उपस्थिती लाभली. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरून त्यांच्या मनात देशभक्ती व आदर्शांचे महत्त्व अधिक दृढ करणारा ठरला.
मूल्य शिक्षण व्याख्यान
२४ फेब्रुवारी २०२६ रोजी मूल्य शिक्षण व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम अत्यंत ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरला.. या व्याख्यानासाठी न्यायाधीश श्री राजपुरोहित उपस्थित होते. न्यायाधीशांनी विद्यार्थ्यांना आपले विचार नेमकेपणाने मांडणे व प्रश्न समजून घेऊन अचूक उत्तर देण्याचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमासाठी प्रा डॉ. सुनीता लोंढे व डॉ. सुनील सोनावणे उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी ठरला.
प्रजासत्ताक दिन:
२६ जानेवारी २०२६ रोजी महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. सर्वांनी राष्ट्रध्वजाला वंदन करून राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला. प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीतं व भाषणे सादर केली.कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. सुविद्या सरवणकर , सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.


