मूळ अहवाल
य.च.म. मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासकेंद्र शासकीय अध्यापक महाविद्यालय मुंबई बी.एड अभ्यासक्रम
वर्ष 2024-26 व 2025 27 अहवाल
शासकीय अध्यापक महाविद्यालय मुंबई येथे य च महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक विद्यापीठाचे बीएड अभ्यासक्रम अभ्यासकेंद्र कार्यरत असून या अभ्यासकेंद्रावर शैक्षणिक वर्ष 2024 -26 साठी एकूण 30 तर 2025-27 या वर्षासाठी एकूण 41 छात्राध्यापकांची प्रवेश झालेला आहे. बी एड सेवांतर्गत अभ्यासक्रम दोन वर्षाचा असून या कालावधीमध्झै प्रथम वर्षाच्या बॅचसाठी तात्विक विषयांचे समंत्रण, सूक्ष्म अध्यापन, अध्यापन पद्धती. अध्यापिन प्रतिमाने व अप्रगत कौशल्यू यांचे दिग्दर्शन आशय युक्त अध्यापन पद्धती ,कार्यशाळा पाठ नियोजन कार्यशाळा, कृती संशोधन कार्यशाळा, अभिरूप अध्यापन कार्यशाळा, संगणकाचा वापर व संख्याशास्त्र कृतीसत्र इत्यादी संपन्न झाले तर द्वितीय वर्षाच्या वर्गासाठी सरावपाठ, समाजसेवा, कार्यानुभव, सहशालेय उपक्रम, छात्रसेवाकाळ, तात्विक विषयांचे समंत्रणे व अभ्यासक्रमास अनुरूप प्रात्यक्षिके इत्यादींची पूर्तता करून दिनांक 12/04/2026 रोजी मौखिक परीक्षा संपन्न झाली या अभ्यासक्रमासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून सर्व प्रकारचे मार्गदर्शन व नियंत्रण केले जाते. अभ्यासकेंद्र विद्यापीठाचे मार्गदर्शन व नियमावली अनुरूप अभ्यासक्रम पूर्ण करते. प्रस्तुत अभ्यासकेंद्रास डॉ सुविद्या सरवणकर ह्या केंद्रप्रमुख डॉ एस ए सोनवणे हे समन्वयक तसेच डॉ अपर्णा उबाळे श्रीमती नीलम फोंडके आणि श्री मंगेश पाटील हे समंत्रक म्हणून कार्यरत आहेत.


