मूळ अहवाल
महिला आरोग्य शिबिर अहवाल
महिला विकास कक्ष (WDC) तर्फे महाविद्यालयात ७ ऑक्टोबर २०२५ रोजी मुलीसाठी विशेष आरोग्य जनजागृती व वैद्रद्यकीय तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. हे शिबिर कमा हॉस्पिटल, मुंबई यांच्या सहकार्याने महाविद्यालयाच्या वर्ग कक्षात पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन कामा हॉस्पिटलचे डॉ. अंबिका चौधरी आणि WDC समन्वयक डॉ. सुनीता लोंढे यांच्या उपस्थितीत झाले. पहिल्या व दुसऱ्या वर्षाच्या बी.एड. विद्यार्थिनींनी शिबिरात उत्साहाने सहभाग नोंदवला.
डॉक्टरांनी संतुलित आहार, मासिक पाळी स्वच्छता, तरुण मुलीमध्ये आढळणाऱ्या सामान्य आरोग्य समस्या, HPV लसीकरणाचे महत्त्व, मानसिक आरोग्य आणि प्रतिबंधात्मक आरोग्याबाबत माहितीपूर्ण सत्र घेतले. जागृती सत्रानंतर वैद्यकीय पथकाने सर्व विद्यार्थिनीची तपासणी केली. यात रक्तदाब मोजणे, सामान्य शारीरिक तपासणी आणि आरोग्य मूल्यांकनाचा समावेश होता, प्रत्येक विद्यार्थिनीला तिच्या आरोग्य स्थितीनुसार वैयक्तिक मार्गदर्शन व समुपदेशन देण्यात आले.
विद्यार्थिनींच्या वैयक्तिक आरोग्य गरजांनुसार मोफत औषधे देण्यात आली तसेच आरोग्यदायी सवयी व जीवनशैली सुधारण्यासाठी सूचना देण्यात आल्या. शिबिरात विद्यार्थिनींना डॉक्टरांशी मुक्तपणे संवाद साधता आला आणि त्यांच्या शंकांचे समाधान करण्यात आले. एकूणच, महिला आरोग्य शिबिर अत्यंत उपयुक्त ठरले कारण यामुळे तरुण मुलींमध्ये आरोग्य जागृती वाढली आणि योग्य आरोग्य पद्धती अवलंबण्यास प्रोत्साहन मिळाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिल्याबद्दल महाविद्यालयाकडून कामा हॉस्पिटल, मुंबई यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात येतात.


